Chiplun, Prashant Yadav, Kokan Political News
Chiplun, Prashant Yadav, Kokan Political News saam tv
महाराष्ट्र

Kokan Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी हात मिळवणी ? राजीनाम्यानंतर काॅंग्रेस कार्यकर्ता म्हणाला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- जितेश कोळी

Kokan Political News : काँग्रेसच्या (congress) चार माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटात प्रवेश केल्यानंतर बुधवारी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी चिपळूण (chiplun latest news) तालुका काॅंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे दिवसभर उलट सुलट चर्चाना उधाण आले. आज (गुरुवार) यादव यांनी साम टीव्हीशी संवाद साधत राजीनामा देण्याचे कारण आणि पुढील वाटचालीची माहिती दिली.

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या नाराजीबाबत अखेर खंत व्यक्त केली. आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे असे त्यांनी सांगितले. आपले लोक आपल्याशी चर्चा न करता जातात तेंव्हा दुःख होतं असेही त्यांनी नमूद केले.

भविष्यात नेमकी काय भूमिका घ्यावी याबद्दल संभ्रम असून आपली भूमिका आपण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि चर्चेनंतर स्पष्ट करणार असल्याचे यादव यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. दरम्यान आपण पक्ष बदलणार आहात का, या प्रश्नावर यादव यांनी बोलण्यास नकार दिला.

प्रशांत यादव हे राजीनामा दिल्यापासून नॉट रिचेबल हाेते. आज त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान त्यांचे चिपऴूण येथील सहकारी काॅंग्रेस साेडून गेल्याने व्यथित झालेल्या प्रशांत यादव हे सुद्धा एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार की पक्षात राहणार हे आगामी काळात स्पष्ट हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

SCROLL FOR NEXT