Protesters in Tapovan hugging trees to stop the cutting of 1,800 trees planned for the upcoming Kumbh Mela in Nashik. Saam Tv
महाराष्ट्र

तपोवनात चिपको आंदोलन, कुंभमेळ्यासाठी वृक्षसंहार, नेते-अभिनेत्यांचा प्रहार

Raj Thackeray, Sayaji Shinde Warn Government: नाशिकच्या तपोवनात वृक्षांना वाचवण्यासाठी चिपको आंदोलन सुरु आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात राज ठाकरे आणि सयाजी शिंदेंनी सरकारला इशारा दिलाय.

Snehil Shivaji

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात राज ठाकरेंनी सरकारला थेट इशारा दिलाय. प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोवनातील वृक्षतोडीला नाशिककर, पर्यावरणप्रेमींनी विरोध केलेला असतांना आता उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंनी याविरोधात सरकारला थेट संघर्षाचा इशारा दिलाय. राज ठाकरेंनी या वृक्षतोडी विरोधात केलेल्या निवेदनात काय म्हटलंय

कुंभमेळ्यासाठी 1800 वृक्षांच्या कत्तलीला मनसेचा विरोध

याआधीच्या कुंभमेळ्यात वृक्षांची कत्तल न करता दिल्या सुविधा

दुसरीकडे झाडं लावण्याचं सरकारी आश्वासन पोकळ

जमीन सपाट करुन उद्योगपतींना देण्याचा सरकारी डाव

मनसे वृक्षतोड विरोधी लढ्यात संघर्ष करणार

राज ठाकरेंनी थेट उद्योगपतींना जागा देण्यासाठी वृक्षतोडीचा घाट घातल्याचा जळजळीत आरोप करुन खळबळ माजवली. यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. यामुळे राजकारण तर तापलंच आहे मात्र याच 1800 वृक्षांच्या तोडीला अभिनेते सयाजी शिंदेंनी कडवा विरोध केलाय

कुंभमेळ्यातील साधूंसाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली थेट शेकडो झाडांची कत्तल करण्याच्या या निर्णयाविरोधात आता विरोधकांसह खुद्द नाशिककर पेटून उठले आहेत. कारण याआधी झालेल्या कुंभमेळ्यांसाठी अशी वृक्षसंहाराची गरज पडली नव्हती! मग आत्ताच हे कुऱ्हाडींचे घाव कशासाठी?

ही १८०० झाडं तशीच ठेवून साधुग्राम उभारणं खरचं शक्य नाही का...की राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार खरंच कुंभमेळ्याच्या आडून ही १२०० एकर जागा एकर जागी उद्योगपतीना देण्याचा डाव आहे...?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT