Chipi Airport Saam Tv
महाराष्ट्र

Chipi Airport: कोकणवासीयांना मोठा धक्का, मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून बंद; कारण काय?

Chipi- Mumbai Flight Service Closed: मुंबईहून थेट कोकणात जाण्यासाठी चिपी येथे प्रचंड खर्च करून विमानतळ उभारण्यात आले. या विमानसेवेला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. पण मुंबई- चिपी विमानसेवा आजपासून बंद करण्यात आली आहे.

Priya More

मुंबईवरून कोकणात आणि कोकणातून मुंबईमध्ये येण्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई ही विमानसेवा आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून थेट कोकणात जाण्यासाठी चिपी येथे प्रचंड खर्च करून विमानतळ उभारण्यात आले. या विमानसेवेला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत होता.

मुंबई ते चिपी विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. अलायन्स एअर या कपंनीच्या अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे लक्ष बनली होती. ३ वर्षांपूर्वी मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. पण ही सेवा रडतखडतच सुरु होती. अखेर २६ ऑक्टोबरपासून मुंबई-चिपी आणि चिपी-मुंबई ही विमानसेवा बंद होत आहे. ही सेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू केली होती. ही मुदत आज २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या प्रवासाची २६ तारखेपासूनची तिकीट विक्री बंद होणार आहे.

दरम्यान, चिपी विमानतळावरून फ्लाय ९१ ची पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद ही सेवा सुरु आहे. दरम्यान स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी चिपी विमानतळाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगून विमानसेवा बंद होणार नसून मुंबई रूट दुसऱ्या एअर लाईनला दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याना पत्र पाठवून विमानसेवा बंद पडू न देण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT