Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! २ आठवड्यांत सुरु होणार विमानसेवा

Solapur Airport ready for flight : सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज आहे. चार सदस्यीय डीजीसीए पथकाकडून तपासणी पूर्ण झालीय.
 सोलापूर विमानतळ
Solapur Airport Saam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही मुंबई

सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. विमानतळाची चार सदस्यीय डीजीसीए पथकाने तपासणी केलीय. राहिलेल्या त्रुटी येत्या आठ दिवसांत दूर करून विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

विमानसेवेसाठी सोलापूरचं होटगी रोड विमानतळ सज्ज (Solapur Airport) झालंय. डीजीसीएकडून लवकरच विमानसेवेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना सोलापुरात आणून विमानसेवा सुरू करावी, अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच सोलापूर विमानतळावरुन प्रवासी उड्डाण सुरु होणार असल्याचं (Solapur News) दिसतंय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत फोनवर चर्चा केली आहे. सोलापुरातील विमानतळाच्या तपासणीनंतर डीजीसीए पथक सकारात्मक आहे. दोन आठवड्यांत सोलापुरातील विमानसेवेसाठी परवाना मिळणार आहे.पथकातील चार सदस्यांनी विमानतळाची पाहणी केली आहे. तपासणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

 सोलापूर विमानतळ
Jalgaon Airport News: प्रवाशांसाठी गुडन्यूज! दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद विमानसेवा सुरू होणार, कधीपासून प्रवास करता येणार? वाचा...

विमानसेवा लवकरच सुरू होणार

विमानतळ परिसराला लागून असलेल्या नागरी वसाहतीच्या खिडक्या विमानतळाच्या दिशेने (Solapur Airport Update) होत्या. या खिडक्या बंद करण्याची सूचना सिव्हिल एव्हिगेशन टीमने केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने खिडक्या बंद करायला लावल्या आहेत. अद्याप काही खिडक्या आहेत. त्या लवकर बंद होतील. विमानतळाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत मोठे दगड (hotgi road airport) आढळले. विमानतळ परिसरातून दगड काढून टाकण्याची सूचना पथकाने केलीय. त्यामुळे प्रशासन लवकरच यावर कार्यवाही करणार आहे.

सोलापुरमधील प्रवासी विमानसेवा सुरु करण्याच्या हेतुने जून २०२३ मध्ये चिमणी पाडण्यात आली होती. जानेवारी महिन्यामध्ये विमानतळ बंद होवून कामांना सुरुवात झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर विमानतळावर विमान उतरले होते. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विमानसेवा सुरु होऊ शकतात, असं बोललं जातंय.

 सोलापूर विमानतळ
Mexico International Airport: फ्लाइट टेक ऑफ होणारच होती..इतक्यात इमर्जन्सी गेट उघडून प्रवासी आला बाहेर अन् केलं भयंकर कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com