बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, यावल तालुक्यातील किनगावमधील घटना Google
महाराष्ट्र

Yawal Taluka News: आईच्‍या डोळ्यासमोर ७ वर्षाचा मुलगा बिबट्याच्‍या जबड्यात; शेतातून उचलून नेलं

Yawal Taluka: जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव साखळी परिसरात बिबट्याने शेतात खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव साखळी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करीत असलेल्या आईच्या जवळ खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना जंगलालगतच्या शेतामध्ये घडली.

यावल तालुक्यातील किनगाव जवळील साखळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात काम करत असलेल्या एका आदिवासी महिलेच्या सात वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने अचानक हल्ला करून मुलाला उचलून नेले. आई आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत बिबट्याने त्याला ठार मारले होते.

जळगाव वन विभागाच्या यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रातील किनगाव साकळी परिसरातील मानकी शिवारात एक ही घटना घडली. केशा प्रेमा बारेला (वय ७) हा आदिवासी मुलगा आपल्या आईसोबत जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने मुलाला तिच्या हातातून ओढून नेले आणि गंभीर जखमी केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे साखळी किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT