लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: राजेश टोपे
लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: राजेश टोपे Saam Tv
महाराष्ट्र

लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: राजेश टोपे

लक्ष्मण सोळुंके

राज्यातील ज्या जिल्हयामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत असून हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही टोपे यांनी सांगितलं आहे. टोपे यांच्या हस्ते आज जालन्यात १०० खाटाच्या कोविडCovid hospitals रुग्णालयाच उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. Chief Minister will take a decision regarding the reduction of lockdown restrictions

सध्या राज्यात लसींचाVaccination तुटवडा मोठ्या प्रमाणात असून राज्यात पूर्ण क्षमेतेने लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे मात्र केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्यानं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे.लसींचा केंद्राकडून चांगल्या प्रमाणात पुरवठा झाल्यास राज्यात ७० ते ८० टक्के लसीकरण पूर्ण होऊन निर्बंध कमी करण्यास मदत होईल असंही टोपे म्हणाले.

पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम पाठवण्यात आल्या असून साथीचे आजार पसरवू नये म्हणून प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश देण्यात आले असून खाजगी हॉस्पिटलमध्ये Private Hospital सीरियस रूग्णांसाठीserious patients 50 टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

फ्रंट लाईन वर्करमध्ये 35 टक्के लसीकरण झालं असून फ्रंट लाईन वर्कर्सनी सर्वात अगोदर लसीकरण करून घ्यावं जेणेकरून तिसऱ्या लाटेत या कर्मचाऱ्यांना आणखी काम करता येईल असं सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची सूचना केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: तेरणा कारखान्यातील भंगारावरुन तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा, व्यंगचित्र समाज माध्यमात व्हायरल

Today's Gold Silver Rate : चांदीच्या दरात प्रति किलो ०६ हजारांची घट, सोनंही स्वस्त झालं; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी

Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची गावाकडे जायची सोय झाली; रेल्वे तिकीट बुकिंगबाबत मोठी अपडेट

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

SCROLL FOR NEXT