CM Shinde And Sharad pawar Saam Tv
महाराष्ट्र

100th All India Marathi Theater : CM शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर; कलाकारांच्या मानधनात वाढ करा, पवारांची मागणी

CM Shinde : १०० व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटना प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर दिसून आले. यावेळी भाषण करताना शिंदेंनी फटकेबाजी केली. तर शरद पवार यांनी वृद्ध कलाकारांचे मानधान वाढवण्याची मागणी केली.

Bharat Jadhav

100th All India Marathi Theater Conference:

चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते १०० व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर एकत्र आले. नियतीच्या मनात होतं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभरावे संमेलन व्हावं,आणि आज ते झालं, अशी फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. तर शरद पवारांनी कलाकारांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. (Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होते. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांनी "वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनामुळे(Corona) झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि१०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो. पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे, बसणारे ते ३६५ दिवस अभिनय करत असतात. तसेच नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय अशी मिश्कील टिप्पणी प्रशांत दामले यांनी यावेळी केली. नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे. असे प्रतिपदान प्रशांत दामले यांनी यावेळी केले.

नाट्यगृहांचा प्रश्न हल्ली सातत्याने मांडला जातो. नाट्यगृह बांधतानाच काही गोष्टींचा विचार परिषद आणि शासनकर्त्यांनी करायला हवा.असं सांगताना अजित भुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. नाट्यव्यवसायाला उद्योगाचं रूप कसं देता येईल ह्यासाठी ते सतत कार्यरत असतात.

सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार ह्यांच्या रुपाने आम्हाला एक नाट्यप्रिय रसिक लाभला आहे, जो संपूर्ण कलाक्षेत्रातील कलाकारांना उत्तेजन देत असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी अर्थमंत्री ह्या भूमिकेत जास्तीत जास्त निधी ह्या संमेलनाासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजचे उद्घाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच मराठी नाटक प्रगतीपथावर राहावं ह्यासाठी मदत करायला उत्सुक असल्याचं भुरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT