Ladki Bahin Yojana salary  SaamTV
महाराष्ट्र

लाडकीला फेब्रुवारीचा आठवा हप्ता आजच? वित्त विभागाकडून 'इतके' कोटी वर्ग; पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट

Ladki Bahin Yojna : चारचाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासकीय नोकरीत महिला असेल तर लाभ घेता येणार नाही.

Prashant Patil

मुंबई : लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरकारी यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरु आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी घटणार आहे. दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हफ्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. पाहूया एक रिपोर्ट

एकीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची शासकीय यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरु आहे. दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता होती. लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्ताचे 1500 रुपये जमा होणार आहे....वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे...डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्यात. त्यामुळे जानेवारीपर्यंत 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला आहेत. मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण सरकारने काटेकोर निकष लावले आहेत. पाहूया कोणते निकष आहेत आणि नियमांत काय बदल केला आहे.

चारचाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासकीय नोकरीत महिला असेल तर लाभ घेता येणार नाही. जर महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थायिक झाली असेल त्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करुन हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार आहे.

नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांचा लाभ मिळेल. त्यापेक्षा अधिक पैसे मिळणार नाहीत. यासाठी प्रत्येक विभागातून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आता नव्याने छाननी सुरु झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहीणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहीणी अपात्र ठरणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरील भारही कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT