Eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतच मुंबईकरांना शब्द; लाडकी बहीण, धनुष्यबाण चिन्ह, टोलमाफीवरही सर्व काही बोलले!

बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांनाच मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मूळचा मुंबईकर शहराच्या बाहेर जात असल्याचा मुद्दा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तापला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याच मुद्यावरून उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांनाच मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत दिला. याशिवाय लाडकी बहीण योजना, काही दिवसांपूर्वी मुंबईतील टोलमाफी आणि सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरही त्यांनी भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तुकाराम काते यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर तुफान हल्ला चढवला. चेंबूरमधील अनेक नागरिकांची भेट घेतली. तुकाराम काते यांना विजयी करणार म्हणजे करणारच असा आतून आवाज येत होता, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने दोन वर्षांत विकासकामे केली आहेत. महाविकास आघाडीने अडकवलेले विकास, लावलेले स्पीड ब्रेकर हटवले आणि आम्ही विकास प्रकल्प सुरू केले. लोककल्याणकारी योजनाही राबवल्या. आम्ही हफ्ते खाणारे नाहीत, तर बहिणींना हफ्ते देणारे आहोत. कोर्टातून एकदा चपराक दिली, आता नागपूर कोर्टातून पण चपराक बसेल. लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके कामगार, लाडके शेतकरी, लाडके पत्रकार पण आहेत, त्यांचे पण स्वागत असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे काय काय म्हणाले? वाचा ठळक मुद्दे

हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काही लोकांनी धनुष्यबाण दुसऱ्यांकडे हाती गहाण ठेवला होता. आम्ही तो सोडवला.

SRA रखडलेले प्रकल्प, धोकादायक इमारती प्रकल्प, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी आदी सर्व विकासकामे करणार

17 हजार घरांचा विकास करत आहोत.

बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार.

तुकाराम काते सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यासारख्या कॉमन मॅन आहे.

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह तयार केला होता. विरोधकांवर हल्लाबोल

कोणी पण माय का लाल आला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. 1500 वरून 2100 वर रक्कम आणली. लाडक्या बहिणीला आम्ही लखपती होताना पाहणार. आम्ही कर्जमाफी करणार, कोणी उपाशी राहणार नाही.

आम्ही दहा कलमी निर्णय घेतले.

टोल माफी आम्ही दिली. 2 कोटी वाहनांना याचा फायदा झाला.

धनुष्यबाण बटण दाबा. यांची बुलेट ट्रेन सुसाट धावू द्या आणि विधानभवनात पोहचू द्या.

गो मातेला राष्ट्रमाता बनवणारे सरकार आहे.

धनुष्यबाण दिसला तर त्याचे बटण दाबा आणि कमळ असेल तर ते बटण दाबा.

20 तारखेला तुकारामांचा गुलाल उडवायला एकनाथ शिंदे येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!

Maharashtra Exit Poll: कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे होणार आमदार? पाहा Exit Poll

Horoscope Today : आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता, तर काहींना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी; तुमची रास यात आहे का?

Maharashtra Exit Polls : शरद पवार की अजित पवार, पिंपरीकरांचा कौल कुणाला? संभाव्य आमदाराचे नाव स्पष्ट

Horoscope Today : जवळच्या लोकांकडून त्रास संभावणार, तर कोणाचे खर्चाचं वाढेल प्रमाण; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT