Eknath Shinde Cm Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : अजित पवार सत्तेत सहभागी का झाले? CM शिंदेंनी सांगितलं यामागचं ठोस कारण!

CM Eknath Shinde: शेतकऱ्यांना दुप्पट लाभ आपण देण्याचं काम आपल्या सरकारने केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

Bharat Jadhav

Chief Minister Eknath Shinde In Bhandara :

काही लोकांना हा कार्यक्रम इव्हेंट दिसतो. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांना काय दिसणार. काही लोक जिल्ह्याच्या बाहेर जात नाही त्यांना काय समजणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. अजित पवार गट सत्तेत सहभागी का झाला? यामागचं कारणही यावेळी शिंदेंनी सांगितलं. (Latest News)

भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महायुतीचे तिन्ही नेते एकत्र दिसले. दरम्यान विरोधकांकडून सरकारच्या या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून टीका केली जाते. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी भाषणातून उत्तर दिलं. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. हा इव्हेंट असल्याची पोटदुखी अनेकांना आहे. गर्दी पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

राजकारण करण्याच्या अनेक संधी येत असतात. परंतु शासन आपल्या दारी कार्यक्रमात शासन लोकांच्या दारी येत असते. यामुळे या कार्यक्रमाला हजारो लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आपलं सरकार हे घरी बसणारं नाही, तर शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आहे. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे आला आहात. येथे अनेकांना विविध योजनांचा लाभ देण्याचं काम सरकार करत आहे. याचाच जळफळाट विरोधकांना होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. शेतकऱ्यांना दुप्पट लाभ आपण देण्याचं काम आपल्या सरकारने केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. यादरम्यान अजित पवार गट सत्तेत सामील का झाला याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अजित पवार आपल्यासोबत आले. देशाचा विकास वेगाने सुरू आहे. सर्वांगीण विकास करण्याचं काम सरकार करत आहे. ही भावना लक्षात ठेवून एकत्र आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

पीक पाहणीची मुदत वाढवण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केली. १५ तारखेऐवजी ३० तारखेपर्यंत करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. याचबरोबर त्यांनी धानाला बोनस देण्याची घोषणा नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणी केलीय.

परंतु अजित पवार यांच्याकडे तिजोरी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे. भंडरा जिल्ह्यात पर्यटनाचा विकास आव आहे. पर्यटनावर काम केल्यानंतर लोकांच्या हाताला काम मिळेल. लोकांना रोजगार मिळेल.

योजनांचा उल्लेख

या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री शिंदेंनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची चावी दिली. तसेच शेतकऱ्यांना ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आहे, याची पाहणी तिघांनी केलीय. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी स्वत ड्रोन हँडल केला. भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे. भंडरा जिल्ह्यात पर्यटनाचा विकास आव आहे. पर्यटनावर काम केल्यानंतर लोकांच्या हाताला काम मिळेल. लोकांना रोजगार मिळेल. गाव तेथे गोदाम ही योजना लागू केली जाईल.

शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या सर्व योजना राबवण्यात येणार आहेत. आपल्याला आत्मनिर्भर देशाप्रमाणे आत्मनिर्भर राज्य करायचं आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करायचं आहे. भंडारा येथे उद्योग उभारण्यात येतील, यासाठी सरकार कमी पडणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT