Eknath Shinde Criticize Opposition saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde Criticize Opposition: विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये, त्यांना काय करावं सुचत नाहीये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

Eknath Shinde Criticize Opposition: विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना काय करावं हे सुचत नाहीये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

Chandrakant Jagtap

CM Eknath Shinde Ayodhya Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. "राम लल्लाचे दर्शन घ्यायला जाण्यावरुनही विरोधक राजकारण करत आहेत. विरोधी पक्षाला काय करावं काय करू नये हे देखील सुचत नाही.

याचं कारण राज्य सरकारने गेल्या सात आठ महिन्यांपासून राज्य सरकारने सामाजातील प्रत्येक घटकासाठी केलेले काम आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या टिकेला आम्ही कामाने उत्तर देऊ असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

यासोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले एक मात्र नक्की के सगळे कामाला लागले आहेत. पूर्वी जे कुठे दिसतही नव्हते ते रस्त्यावर येऊ लागले, लोकांना भेटू लागले ही चांगली बाब आहे. परिवर्तन झाले आहे, काही लोक बरे झालेत असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चाललेत अशी टीका त्यांनी केली होती. याबाबत विचारल्यानंतर त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी काम करतोय अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Political News)

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यानतंर अजित पवार काय देतात? मला परत जुन्या विषयावर त्यांनी जायला लावू नये. अयोध्या हा आमच्या भावनेचा, अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. बाळासाहेबांपासून ते धर्मवीर आनंद दिघेंपर्यंत हा आमचा श्रद्धेचा विषय आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. कारण अतिशय वेगाने भव्य दिव्य असे आंतरराष्ट्रीय क्रिर्तीचे राम मंदीर उभे राहत आहे. ही कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आणि स्वप्न आहे. ते मोदी पूर्ण करत आहेत. त्यामुळे विरोधक काय बोलताय ते त्यांना बोलू द्या असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT