CM Devendra Fadnavis clarifies on GR: OBC quota will not be affected saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: सरकारने काढलेला GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही: मुख्यमंत्र्यांचे विधान

Devendra Fadnavis on GR Controversy : सरकारचा जीआर संपूर्ण आरक्षण देत नाही. ओबीसी कोट्याला यातून कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली.

  • सरकारच्या जीआरमध्ये ‘सरसकट आरक्षण’चा उल्लेख नाही.

  • मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी.

'जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही. जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही. त्यात कुठेही सरसकट अशा शब्दाचा उल्लेख नाहीये', त्यामुळे ओबीसीचे नुकसान होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. मुख्यमंत्री मुंबईत पत्रकाराशी बोलत होते. (Cm Fadnavis On Reservation Gr: Obc Quota Safe, No Blanket Reservation)

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झालेत. सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी आक्रमक झाले असून मुंबईत मोर्चा काढणार आहेत. सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ६ मागण्या मान्य केल्या. त्यानंतर ओबीसीमध्ये नाराजी आहे.

तर दुसरीकडे वंजारा समाजानेही आपला एसटीमध्ये समावेश करण्यात यावा अशी केलीय. त्यामुळे राज्यात आरक्षणावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्यानं ओबीसी नेते आक्रमक झालेत. त्यांच्या बैठका सत्र सुरू झालंय.

महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवलीय. तसेच मुख्यमंत्र्यांना त्याबाबत त्यांनी पत्र लिहिले आहे. दुसरीकडे विदर्भातील ओबीसी नेत्यांनी आंदोलनाचा एल्गार उगारलाय. नागपूरमध्ये ते आंदोलन करणार आहेत. न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढण्यास ते तयार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ओबीसी मुंबईत आंदोलन काढणार आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, असे आंदोलन काढण्याची गरज नाहीये. कारण सरकारच्या जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होणार नाहीये.

ओबीसी समाजाला मोर्चा काढण्याची गरज नाहीये. अनेक ओबीसी नेत्यांशी चर्चा होतेय. ज्यावेळी जीआर काढण्यात आलं त्यावेळी त्याचे शंकेचे निरसन झालंय. पण कोणी राजकीयदृष्ट्या काही करत असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही. सरकारने काढलेला जीआर आहे कायद्यात बसणार आहे. त्यातून कोणत्याच समाजाचे नुकसान होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला

मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात भुजबळांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया दिली. आहे. कोर्टात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण मराठा आरक्षणाचा जो जीआर काढला आहे. यामध्ये एक एक शब्द हा कायद्याच्या चौकटीत बसणारा असून कायदेक्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा जीआर तयार केलेला आहे. त्यामुळे त्या जीआरला कोणीही चॅलेंज केले तरी कोणताही धोका होणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त करत छगन भुजबळांना एकप्रकारे टोलाच लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन सीझन ३'साठी मनोज वाजपेयीसह बाकी कलाकारांना किती मिळालं मानधन?

SCROLL FOR NEXT