Vehicles stuck in a massive traffic jam at Khandala Ghat as CM Devendra Fadnavis apologises to commuters. saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: सुट्ट्यांची गर्दी आणि प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे खंडाळा घाटाजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीव्र वाहतूक कोंडी झाली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे.

Bharat Jadhav

  • खंडाळा घाटात अभूतपूर्व वाहतूक कोंडी

  • मिसिंग लिंक प्रकल्प उद्घाटनामुळे गर्दी वाढली

  • सुट्टीमुळे वाहनांची मोठी संख्या

खंडाळा घाटात आज सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेनं निघालेली वाहने तासन् तास घाटातच अडकून पडली आहेत. उष्णतेमुळे प्रवाशी हैरान झाले आहेत.याला कारण ठरलं बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पूलाचे उद्धघाटन झाले. परंतु आज १ मे आणि पुढचे दोन दिवस शनिवार-रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गावाकडे निघाले. त्यामुळे घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली असून तेथे ट्रॉफिक जॅम झाली आहे.

एकीकडे या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘वाईडेस्ट टनेल’ अर्थात जगतला सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली, दुसरीकडे घाटातील ट्रॉफिकमुळे प्रवाशी हैरान झाले. दरम्यान वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. मात्र आज उद्घाटनच्या दिवशी एक्सप्रेसवर मोठी वाहतूककोंडी झाली. दरम्यान ट्रॉफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. यासह मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला 'मिसिंग लिंक' ऐवजी 'कनेक्टिटिंग लिंक' नाव द्या असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा खासदार सुप्रिया सुळेंनाही या कोंडीचा सामना करावा लागला. त्यांनी व्हिडीओद्वारे मिसिंग लिंकच्या उद्घाटनाआधीच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दाखवलं. यानंतर मिसिंग लिंकच्या लोकापर्णानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची माफी मागितली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनाही खास सल्ला दिला.

मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाल्याने अतिशय आनंद आहे होतोय. जवळपास ७१८१ कोटी रुपये या प्रकल्पासाठी लागले आहेत. आपण एक चमत्कार तयार करू शकलो. मला मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे. त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बरेच लोक कोंडीत अडकले होते. सुप्रिया सुळेदेखील अडकल्या. त्यांनी काढलेल्या व्हिडीओमधून त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. पण त्या शेवटच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत. कारण आता कनेक्टिंग लिंक झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस उद्धघाटनावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT