Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) धक्कादायक घटना घडली आहे. काही महिलांनी मिळून समाजसेवाला चप्पलने बेदम मारहाण केली. त्यानंतर या समाजसेवकाची (Social Worker) कॉलर आणि केस धरुन रस्त्यावरुन धिंड काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरामध्ये (Kannad City) ही घटना घडली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत या महिलांनी या समाजसेवकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय योजनांच्या कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब एका महिलेने सामाजिक कार्यकर्त्याला विचारला होता. यावरुन या सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर काही महिलांनी एकत्र येत या समाजसेवकाची धुलाई केली. या महिलांनी एकत्र येत सुरुवातीला समाजसेवकापा चपलेने मारहाण केली. केस आणि कॉलर धरून रस्त्यावरुन त्याची धिंड काढत थेट पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील मीराबाई पवार यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगितले की, 'बापू नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने शासकीय योजनांच्या कागदपत्रावर माझ्या पतीला मृत दाखवले. त्यामुळे मी त्याला याबाबत जाब विचारला. तर बापूने मला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी दोन महिला आल्या होत्या. तर त्यांना देखील बापूने मारहाण करत शिवीगाळ केला.' या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते बापूविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता बापूने देखील मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्याने १४ महिलांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन देखील पोलिसांनी १४ महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास कन्नड पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.