आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात या निवडणुका पार पडतील. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.
अलिकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अजूनही शिवसेना शिंदे गटाला गळतीचा सामना करावा लागत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदेसेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे. शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
त्यांसोबतच काही महिला कार्यकर्त्यांनी आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा राणी वाडकर हे पक्ष सोडण्याच्या तयारीत होत्या. याबाबत चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी धनु्ष्यबाण सोडून कमळ हाती घेतलं आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. भारतीय जनता पार्टीकडून शतप्रतिशत भाजप हा नारा देत आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.