Chhatrapati Shivaji Maharajs Wagh Nakh Saam Tv
महाराष्ट्र

Wagh Nakh History: शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमध्ये गेली कशी, काय आहे इतिहास?

Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं ब्रिटनमध्ये गेली कशी याचा काय आहे इतिहास.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chhatrapati Shivaji Maharajs Wagh Nakh:

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करण्यासाठी जे वाघनखं वापरली होती. ते वाघनखं ब्रिटनमधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या 'व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट' या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ही वाघनखं परत द्यावीत, याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. या मागणीला ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी मंजूरी दिली असून वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच एक करार करणार आहे.

याविषयीची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. ही वाघनखं परत करण्याबाबतचा करार पूर्ण करण्यासाठी मुनगंटीवार महिनाअखेर लंडनला जाणार आहेत. या करारानंतर ही वाघनखं या वर्षाअखेर भारतात परत येऊ शकतात. दरम्यान या वाघनखांचा आणि ते ब्रिटनमध्ये जाण्याचा एक रंजक इतिहास आहे.

आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळालं की, त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत देण्याचं मान्य केलंय. हिंदू कॅलेंडरनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले. त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळू शकतील. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघनखं परत नेण्याच्या पद्धतही ठरवण्यात येत आहेत.
मंत्री, सुधीर मुनगंटीवार

काय आहे वाघनखांचा इतिहास

वाघनखं हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे शस्त्र आहे. हे शस्त्र मुठीत सहज लपवता येते. वाघांच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलदाची ही तीक्ष्ण नखे असतात. हाताची मुठ वाळल्यानंतर ती पंजात लपवली जातात. हे हत्यार हातात घातल्यानंतर तर्जनी आणि करंगळीमध्ये अंगठ्या घातल्यासारखे दिसते. मराठा साम्राज्यकाळात अनेक प्रकारचे वाघनखं युद्धात वापरली जातं. त्यातील सर्वात चर्चेतील म्हणजे अफजलखानच्या वधासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली 'वाघनखं'. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर वाघनखं महत्त्वाचं शस्त्र म्हणून चर्चेत आले.

मराठ्यांच्या इतिहासात अफजलखानाचा वध ही सर्वात मोठी घटना होती. अफजल खान हा बलाढ्य मोगल सरदार होता. सन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या भेटीला गेले होते, त्यावेळी अफजलखानने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत पकडत त्यांची मान दाबली. शिवाजी महाराजांनी खानची चाल ओळखत त्यांच्या हातात असलेली वाघनखं अफजलखानच्या पोटात घातली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला.

वाघनखं ब्रिटनला गेली कशी

महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची वाघनखं आणि तलवार राज्यात परत आणणार आहे. परंतु महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनला गेली कशी, असा प्रश्न पडतो. त्यामागे पण एक रंजक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. या संग्रहालयात हे वाघनखं गेली कशी यांचा इतिहास जाणून घेऊ.

कोण आहे जेम्स ग्रँड डफ

ब्रिटनच्या संग्रहालयात ही वाघनखं आणली ' जेम्स ग्रँड डफ' या इंग्रजी लेखकाने. साताऱ्याच्या संस्थानात डफला १८१८ मध्ये राजकीय संबंध पाहण्यासाठी नेमण्यात आले होते. जेम्स ग्रँड डफ हा इ.स. १८१८ ते १८२४ च्या दरम्यान सातारातील ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि ईस्ट इंडिया कंपनीमधील संबंधाचे राजकीय व्यवहार तो पाहत असल्याचा दावाही अनेक ठिकाणी करण्यात आलाय.

दरम्यान जेम्स ग्रँड डफला इतिहासाची आवड होती. त्याने मराठ्याच्या इतिहासावर लेखन केलंय. त्याने लिहिलेला ‘हिस्टरी ऑफ मराठाज्‘ हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला पहिलाच गंथ आहे. यामुळेच त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो.

वाघनखं मिळाली गिफ्ट

जेम्स ग्रँड डफचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध होते. त्याने याचदरम्यान शिवाजी महाराजांची वाघनखं प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत, असं काही ठिकाणी लिहिण्यात आलंय. तर काही ठिकाणी करण्यात आलेल्या दाव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी त्याला ही वाघनखं भेट म्हणून देण्यात आली. ज्यावेळी जेम्स ग्रँड डफ ब्रिटनला गेला तेव्हा त्याने ते वाघनखं आपल्यासोबत नेली. त्यानंतर त्याच्या वंशजांनी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे दान केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कणकवलीमधून नितेश राणे यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT