Sangli News, chhatrapati shivaji maharaj, Astha
Sangli News, chhatrapati shivaji maharaj, Astha saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : भाजपचे बंद पाळण्याचे आवाहन, मविआचा विराेध; ताेडगा निघाल्यानंतर शिवप्रेमींचा जल्लाेष

विजय पाटील

Astha Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी जागेच्या हस्तांतरणाला प्रशासनाने परवानगी दिल्याने शिवप्रेमींनी आष्ट्यामध्ये साखर वाटून आतषबाजी करत जल्लोष केला. या निर्णयानंतर शिवप्रेमींनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. (Breaking Marathi News)

शिवप्रेमींनी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) पुतळ्याजवळ महाआरती करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. हा पुतळा रात्री हटवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शिवप्रेमींनी आष्टा मधील सांगली - इस्लामपूर रस्त्यावर सकाळी ठिय्या मारला हाेता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. (Maharashtra News)

आष्टा शहरात पुतळ्यावरून सकाळपासून राजकारण रंगले हाेते. आज भाजपकडून शहर बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर महाविकास आघाडीकडून बंदला विरोध करण्यात आला होता.

दरम्यान आंदाेलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रशासन नमले. शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी जागा हस्तांतरणाला प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर दोन्ही गटांकडून सांगली इस्लामपूर रस्त्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रवीण माने (भाजप) आणि वीर कुदळे (महाविकास आघाडी) यांच्यासह शिवप्रेमींनी प्रशासनाचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT