Zilla Parishad School Student Uniform Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: विद्यार्थ्यांचा गणवेश शिवलाय की चिंध्या जोडल्या? काहींना फाटलेले तर काहींना ढगळ कपडे, शिक्षक अन् पालकांचा संतापजनक सवाल

Rohini Gudaghe

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांची गणवेशासाठी अक्षरशः चेष्टा केल्याचं समोर आलंय. शाळा सुरू तीन महिने झाल्यानंतर आता काही शाळांमध्ये गणवेश वाटपाला सुरू झालंय. मात्र, ते गणवेश मुलांना दिल्यानंतर गणवेश शिवलाय की चिंध्या जोडल्या, असं वाटावं, असे गणवेश देण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये गणवेश वाटप करण्यात आले. त्यात काहींना ढगळ, तर काहींना लहान, अनेकजणांना तिरप्या खिशांचे गणवेश मिळालेले आहेत.

अनेकांना उसवलेले, फाटलेले गणवेश मिळाले आहेत. त्याहूनही धक्कादायक म्हणजे ज्या शाळेत गणवेश देण्यात आलेले आहेत, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून लिहून घेण्यात आलेली आहे की गणवेश चांगले सुस्थितीत दिले (Chhatrapati Sambhajinagar News) आहेत. यावर बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र, मुख्याध्यापक आणि पालकांनी आपला संताप व्यक्त केलाय.

निकृष्ट दर्जाचे गणवेश

गणवेश तयार करताना विद्यार्थ्यांची मापे घेतलेली नव्हती. त्यामुळे ज्या शाळांना गणवेश मिळाले आहेत, तेथील काही विद्यार्थ्यांना ढगळ, काहींना लहान माप असलेले गणवेश मिळाले. काहींच्या शर्टचे खिसे तिरपे तर काहींची खिसे डाव्याऐवजी उजव्या बाजूला लावलेले दिसून (Zilla Parishad School Student Uniform) आले. सातवीच्या अनेक मुलींना अपुऱ्या मापाचे गुडघ्यावर असे गणवेश मिळाले आहेत. काही मुलींचे गणवेश फाटलेले आढळून आले आहेत. हे गणवेश कसे घालावेत, असा प्रश्न आहे. त्यामुळे राहिलेल्या शाळांमध्ये पुरवठादारांनी प्रत्यक्ष जाऊन मुलांना गणवेश द्यायला हवेत, अशी मागणी केली जातेय.

मागील वर्षीच्या युडायस प्लसवरील पटसंख्येनुसार शाळांना गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. मागील वर्षी काही वर्गांची पटसंख्या कमी होती. यंदा ती वाढली. त्यामुळे अशा वर्गातील अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित (Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad) आहेत. गणवेशामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे.

शिक्षक आणि पालकांमध्ये संताप

जुन्या युडायसप्रमाणे गणवेश दिल्याने विद्यार्थी संख्येनुसार गणवेश कमी पडले. पाचवी ते आठवीच्या मुलांना फुल पॅंट देणे अपेक्षित होते. हाफ पॅँट मिळाल्याने मुले नाराज आहेत. सातवीच्या मुलींना देण्यात आलेले गणवेश (School Student Uniform) काहींना फिट तर काहींना ढगळ झाले. मुलींच्या सलवारही छोट्या शिवण्यात आल्या. ओढणी देण्यात आलेली नाही.

शाळेत जाताना पहिलीचे मुलं फुल पॅँट घालून शाळेत येतात. मात्र, शासनामार्फत देण्यात आलेले गणवेश हे सरसकट आठवीपर्यंतच्या मुलांनाही हाफ चड्डी देण्यात आली. आमच्या मुलाने हाफ चड्डी घालण्यास नकार दिला; तसेच मुलींनाही गणवेशामध्ये ओढणी देण्यात आलेली नाही. कपड्याच्या दर्जाही निकृष्ट आहे. मोफत आहे म्हणून कसेही द्यायचे का? असा सवाल शिक्षक संघटना आणि पालकांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Accident : भीषण अपघात..अनियंत्रित ट्रक पलटी होऊन ८५ शेळ्या ठार; अकोला- हैदराबाद महामार्गावरील दुर्घटना

Nandurbar News : लाडक्या बहीणींचा बँकेबाहेर मुक्काम; Video

Perfect Life Partner: परफेक्ट लाईफ पार्टनर होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण पाहिजेत?

Maharashtra News Live Updates: आमदार संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

Cyber attack in israel : अर्ध्या रात्री अचानक फोनची रिंग वाजताच लोक घर सोडून पळाले, इस्त्रायलमध्ये नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT