Chhatrapati Sambhajinagar Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: धक्कादायक! कर्जाला कंटाळून पती पत्नीने मृत्यूला कवटाळले; पैठण तालुक्यात खळबळ

Paithan Crime News: विहरीत दोघांचेही मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली. दोघेही कर्जामुळे तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Salvadgaon Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातून एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. कर्जबाजारपणाला कंटाळून पती पत्नीने विहरीत उडी टाकून जीवन संपवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण (Paithan) तालुक्यातील सालवडगाव येथे पती पत्नीने कर्जाला कंटाळून विहरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. देविदास बाबुराव पाचे आणि मीरा देविदास पाचे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. दोघांचे मृतदेह विहरीत आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

याबाबत गावकऱ्यांकडून घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पती पत्नीचे मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने विहीरीच्या बाहेर काढण्यात आले. तसेच मृतदेह पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar)

दरम्यान, हे दोघे पती-पत्नी गेल्या अनेक दिवसापासून काढलेल्या कर्ज फेडण्याच्या तणावाखाली असल्याची नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यामुळेच पती पत्नीने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

SCROLL FOR NEXT