Nagpur Crime News: किळसवाणं कृत्य! पिण्याच्या पाण्यात कोंबड्यांचे रक्त; घटनेमागे हात कुणाचा?

Contaminated Drinking Water: पिण्याच्या पाण्यात सतत रक्त येत असल्याने परिसरातील नागरिक फार त्रस्त झाले होते.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV
Published On

Nagpur News: नागपूर येथून एक किळसवाणी घटना समोर आली आहे. येथे पिण्याच्या पाण्यात रक्त मिसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंबड्यांचे रक्त थेट पिण्याच्या पाण्याच्या पाण्यात आले आहे. सदर घटनेमुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. (Latest Drinking Water News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या महादूला भागात पिण्याच्या पाण्यात कोंबड्यांचे रक्त आढळले आहे. परिसरात असलेल्या चिकन सेंटरमधून हे रक्त सोडले जात होते. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पिण्याच्या पाण्यात सतत रक्त येत असल्याने परिसरातील नागरिक फार त्रस्त झाले होते.

Nagpur Crime News
Akola Crime News: भररस्त्यात तरुणावर तलवारीने सपासप वार; धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

त्यामुळे संतप्त नागरिकांनी या बाबत नगरपंचायतमध्ये तक्रार केली. यावेळी चौकशी दरम्यान हा प्रकार उघड झाला. नगरपंचायतने मांस विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. यामुळे परिसरातील मांस विक्रेते इतरत्र हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

परिसरात असलेले चिकन विक्रेते आपल्या कोंबड्यांचे रक्त ज्या ठिकाणी जलवाहिनी आहे त्या ठिकाणाहून सोडत होते. जलवाहिनी थोडी फुटलेली असल्याने हे रक्ताचे पाणी थेट नळाद्वारे लोकांच्या घरात येत होते. पिण्याचे पाणी भरताना सर्वच व्यक्ती जास्तीची काळजी घेतात. गाळून उकळून किंवा मग फिल्टर करून पाणी वापरले जाते. अशात पिण्याच्या पाण्यात असं रक्त आढळल्याने नागरिक संतप्त झाले असून तात्काळ मांस विक्रेत्यांना इतर ठिकाणी हटवा अशी मागणी करत आहेत.

Nagpur Crime News
Tiger - Deer Hunting Video: खरंच ना भावा! वाघाची शिकार हरणीने केली; सत्य घटनेचा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com