sawangi  Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र पुन्हा हादरला! सहावीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, इंग्रजी शाळेतील घटना

schhatrapati sambhajinagar sawangi : छत्रपती संभाजीनगरमध्ये सहावीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. इंग्रजी शाळेत ही घटना घडली आहे.

डॉ. माधव सावरगावे

वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सावंगीतील इंग्रजी शाळेत धक्कादायक घटना

घटनेने सावंगीमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीतील ११ वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील चार विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडिताच्या वडिलांनी शनिवारी फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या चारही मुलांविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, चार विद्यार्थ्यांकडून पीडित मुलावर काही दिवसांपासून हातवारे, अश्लील इशारे आणि मानसिक छळ केला जात होता. २४ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या मैदानात आरोपी विद्यार्थ्यांनी त्याला अडवून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्या घटनेनंतर पीडित मुलगा भीतीखाली वावरत होता. शेवटी, शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याने वडिलांना सर्व घटना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फुलंब्री ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सावंगीमधल्या इंग्रजी शाळेमध्ये सहाव्या वर्गात शिकणाऱ्या चार मुलांनी त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला. चार मुलांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचा पालकाचा आरोप आहे. याप्रकरणी पोस्को अंतर्गत फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्य चौकशी कमिटी नेमून चौकशी सुरू केली आहे. मात्र शाळेने मुलांवर कुठलीही कार्यवाही केली नाही. याउलट पालकांवरच दबाव आणल्याचा त्यांचा आरोप आहेत.

पोलीस काय म्हणाले?

पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी फुलंब्री प्रकरणावर भाष्य केलं. पोलीस अक्षीक्षक राठोड म्हणाले, डिसेंबर महिन्यातील हा प्रकार आहे. सहावीतील तो विद्यार्थी आहे. त्यातील चार आरोपी हे बालक देखील विधीसंघर्ष बालक आहेत. हा संवेदनशील गुन्हा असल्याने पोलीस उपअधीक्षकांकडे तो गुन्हा दिला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT