UBT Leaders Raju Shinde and Sachin Vani Switch to BJP Saam
महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

UBT Leaders Raju Shinde and Sachin Vani Switch to BJP: शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. एम. वाणी यांचा मुलगा सचिन वाणी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. आज भाजपमध्ये प्रवेश करणार.

Bhagyashree Kamble

  • छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

  • २ बड्या नेत्यांनी सोडली साथ

  • लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मात्र, अद्याप महानगरपालिका निवडणुकांबाबत तारखा समोर आलेल्या नाहीत. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील, जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका पार पडतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुठे फोडाफोडीचं तर कुठे स्वखुशीने पक्षाची साथ सोडण्यात येत आहे. तर, काही पक्षाकडून स्वबळाचे नारे देण्यात येत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला झटका बसला आहे. कारण माजी आमदार स्वर्गीय आर. एम. वाणी यांचा मुलगा सचिन वाणी यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन वाणी यांनी ठाकरे गटाची साथ सोडून भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला जोरदार झटका बसणार आहे. मागच्या वर्षी संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे राजू शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलं होतं. आज भाजप पक्षात पुन्हा प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

तसेच शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. एम. वाणी यांचा मुलगा सचिन वाणी यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सचिन वाणी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे वैजापूर शहरात शिवसेना ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सचिन वाणी यांनी शिवसेनेच्या समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून सचिन वाणी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. याच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सचिन वाणी यांचा भाजप प्रवेश निश्चित झालं आहे. सचिन वाणी यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Trailer: अ‍ॅक्शन अवतारात दिसणार बॉलिवूडचे 'धुरंधर'; अंगावर काटा येणारा ट्रेलर, डायलॉग ऐकून कराल कौतुक

Belly Fat Reduce Tips: रोज जिम करून वजन कमी होत नाही, हे घरगुती उपाय करा, पोटाची ढेरी लगेच होईल कमी

Ajit Pawar: फोडलेले नारळ, हळद-कंकू अन् लिंबू...; बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा

Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Kitchen Cleaning Hacks : खराब झालेले लाकडी पोळपाट कसे कराल साफ ? या टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT