बेशिस्त वाहन चालकांना दणका! छ. संभाजीनगर पोलिसांनी वसूल केला २ लाख ६१ हजारांचा दंड SaamTvnews
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: बेशिस्त वाहन चालकांना दणका! छ. संभाजीनगर पोलिसांनी वसूल केला २ लाख ६१ हजारांचा दंड

एकीकडे रिमझिम पाऊस सुरु तर दुसरीकडे पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरु होता.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhtrapati Sambhajinagar News: रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong side) आणि एकेरी वाहन चालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार वाहनचालकांची संख्या छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून (Traffic police Report) ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून याविरोधात आता शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांत शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मुख्य रस्ते असो की अंतर्गत रस्ते, जूने शहर असो की नवे सर्वच ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी शाळा भरण्याच्या वेळी आणि सुटण्याच्या वेळी सर्वच मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते.

विशेष म्हणजे राँग साईडने जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शहरातील वेगेवेगळ्या भागात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. काल दिवसभरात वन-वे आणि नो एन्ट्रीमध्ये वाहने घालून नियम तोडणाऱ्या एकूण 304 लोकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना 2 लाख 61 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काल (२७ जून) ला शहरात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह शेकडो वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरले. एकीकडे रिमझिम पाऊस सुरु तर दुसरीकडे पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. मात्र बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर अशा कारवाईमुळे आळा बसेल.. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT