Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana Scam: 'लाडकी बहीण' योजनेत तरुणांची घुसखोरी! १२ भावांनी महिलांचे फोटो लावून भरले अर्ज; कुठे घडला प्रकार?

Chhatrapati Sambhajinagar Breaking News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर, ता. १३ सप्टेंबर

Ladki Bahin Yojana Scam Chhatrapati Sambhajinagar: महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सध्या चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच काही गैरप्रकार होत असल्याचेही उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचे समोर आले होते.

अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

लाडकी बहीण योजनेत मोठा स्कॅम..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल आहे. या धक्कादायक प्रकाराने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

१२ भावांनी भरले अर्ज...

तसेच जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी असे अर्ज केल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. त्याची सखोल चौकशी सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे.

ज्यामध्ये १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. या तरुणांनी आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला, फक्त पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साताऱ्यातील एका तरुणानेही पत्नीच्या नावाने तब्बल ३० अर्ज भरल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे आता या योजनेच्या अंमलबजवाणीदरम्यान होणारे गैरप्रकार लक्षात घेता राज्य सरकारने कडक नियम करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT