Rush In Bank Due To Ladaki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची पैसे काढण्यासाठी गर्दी, बँक कर्मचारी वैतागले; थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहलं पत्र

Rush In Bank Due To Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अकाऊंटमध्ये पैसे आल्यानंतर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचारी वैतागले आहेत.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

लाडकी बहीण योजनेमुळे एकीकडे राज्यातील महिलांच्या अकाऊंटमध्ये ३००० रुपये आल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अकाऊंटमध्ये पैसे आल्यानंतर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचारी वैतागले आहेत. या मोठ्या गर्दीमुळे बँकेच्या कामात अडथळे येत आहेत. यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेनंतर बँकेत मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यासोबतच विविध योजनांसाठी लोकांची गर्दी होत असल्यामुळे बँकेतल्या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. काही वेळा अनेक जण बँक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर जात आहेत. आपले काम होत नसल्यामुळे ग्राहक बँकेच्या कर्मचाऱ्यांवरच संताप व्यक्त करत आहेत. अनेकदा त्यांच्यामध्ये वाद देखील होताना दिसत आहे.

बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मोठा ताण बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येत आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी करणारे पत्र युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. बँक फोरमचे देविदास तुळजापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात थेट पत्र पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT