Chhatrapati Sambhajinagar News Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: भाईगिरी करणाऱ्यांची जिरवली! पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची काढली धिंड

ज्या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी त्याच भागात गुंडांना फिरविल्याने पोलिस निरीक्षक राजश्री आडे आणि पुंडलिकनगर पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Crime: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. पुणे शहरात गुन्हेगारी घटना वाढल्यानंतर पोलिसांकडून धिंड मोहिम राबवण्यात येत आहे. दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची त्याच भागातून धिंड काढण्याची मोहिम पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.

आता हाच पुणे पोलिसांचा पॅटर्न छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची धिंड काढली. त्यांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात वर्चस्ववादातून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. यामधील एक टोळी उज्जैनचा चर्चित डॉन दुर्लभ कश्यपला फॉलो करते. इतकेच नव्हेतर गतवर्षी त्यांनी एका चौकाला कश्यपचे नाव दिले होते. तेव्हापासून या टोळीची दहशत आहे.

शहरात दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व वादातून राडा झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी कश्यप टोळीच्या पाच आणि विरोधी टोळीच्या एक, अशा सहा जणांना अटक केली. तसेच ज्या ठिकाणी दहशत माजवली त्याच परिसरात त्यांची धिंड काढली.

पंचनामा करण्यासाठी पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी आरोपींना घटनास्थळी नेले. चिंचोळा रस्ता असल्याने आणि घटनास्थळी टू मोबाईल (पोलिस व्हॅन) जात नसल्यामुळे व आरोपींची संख्या अधिक असल्याने त्यांना पायी चालत नेले, असे पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

दरम्यान, ज्या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी त्याच भागात गुंडांना फिरविल्याने पोलिस निरीक्षक राजश्री आडे आणि पुंडलिकनगर पोलिसांचे नागरिकांनी आभार मानले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT