Maratha Reservation Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा बांधव आक्रमक! छत्रपती संभाजीनगरमध्ये अडवला केंद्रीय मंत्र्यांचा ताफा

Chhatrapati Sambhajinagar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्याला मराठा आंदोलकांचा चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

लक्ष्मण सोळुंके

Maratha Reservation:

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यालाही चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळाले. मराठा बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असतानाच हा कार्यक्रम आटोपून येताना केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( २६, ऑक्टोंबर) शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे परतताना केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वैजापूर संभाजीनगर महामार्गावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवला. यावेळी पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण शिर्डी दौऱ्याला मराठा आंदोलकांचा जोरदार विरोध पाहायला मिळाला.  नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणामध्ये काळ्याफिती लावून पंतप्रधान मोदींचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. गो बॅक..गो बॅक; मोदी गो बॅक अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या.

कार्यक्रमाला जाणाऱ्या बसची तोडफोड...

तसेच मराठा आंदोलकांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणारी बस फोडल्याचेही समोर आले आहे. शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बस (क्र. एमएच. 14, बीटी 2158)च्या अज्ञातांनी काचा फोडल्या. यामुळे ही बस चालक पी. पी. फुंदे यांनी पुन्हा शेवगाव आगारात पुन्हा आणली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

Maharashtra Live News Update: धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ, देवपूरमध्ये शेकडो मतदान कार्डांचासाठा

Facial Hair in Women: महिलांना दाढी मिशी का येते? माहितीये का कारण?

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT