Chhatrapati Sambhajinagar Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: पाकिस्तानी तरुणाशी लग्न; ९ महिन्यांनी भारतात परतली अन्.. छत्रपती संभाजीनगरमधील महिलेचा ATS कडून शोध सुरू

Chhatrapati Sambhajinagar Police: महिलेचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar News: सध्या देशात सीमा हैदर आणि सचिनची लवस्टोरी चांगलीच चर्चेत आहे. अगदी असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका विवाहित महिलेचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्यावरून तिची चौकशी सुरू झाली आहे, काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील एका व्यावसायिकाची पत्नी डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानी तरुणासोबत पळून गेली होती. ती त्याच्यासोबत सौदी अरेबिया व लिबियाला निघून गेली. 3 ऑगस्टला ती देशात परतली.

त्या दरम्यान तिचा काही आतंकवादी संघटनांसोबत संपर्क आला असून देशविघातक कृत्यांमध्ये तिचा सहभाग असल्याचा संशय ई-मेल पोलिसांना मिळाला आहे. यामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून एटीएस तपास करत आहे. महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी आहे.

मूळ मालेगावची (Malegaon) असलेल्या या 24 वर्षीय महिलेचे सिडकोतील एका व्यावसायिकासोबत 2011 मध्ये लग्न झाले. 2022 मध्ये ती वडिलांसोबत सौदीमध्ये गेली होती. त्या दरम्यान तिची एका पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाली. देशात परत आल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात राहिली. सोशल मीडियावरून ओळख वाढल्यानंतर आणि त्याच्यासोबत डिसेंबर 2022 मध्ये तिने देश सोडला.

याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. डिसेंबरमध्ये ती गेल्यानंतर जानेवारी महिन्यात पतीला तिने पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न केल्याचे सांगितले होते. आता एटीएस अधिकारी महिलेच्या परदेश प्रवासाच्या इतिहासाची पडताळणी करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोरंट पॉवरचे वृक्षतोड उबाठा शिवसेनेने पाडली बंद

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT