Ajit Pawar on Maratha Reservation:  Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'अजित पवारांना येऊ देऊ नका...' छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधव आक्रमक

Ajit Pawar News: मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनी येऊ नये.. अशी भूमिका आंदोलकांनी घेतली असून तशा आशयाचे पत्रही तहसीलदारांना देण्यात आले आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून ज्याचा थेट फटका राजकीय नेत्यांना बसत आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळत आहे.

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) दिवसेंदिवस वातावरण तापताना दिसत आहे. आरक्षण देईपर्यंत राजकीय नेत्यांना अनेक गावांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णयही मराठा बांधवांनी घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यालाही मराठा बांधवांनी विरोध दर्शवला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमालाही मराठा बांधवांनी विरोध केला आहे.

संमेलनाच्या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनी येऊ नये.. अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनी येऊ नये.. अशी भूमिका आंदोलकांनी घेतली असून तशा आशयाचे पत्रही तहसीलदारांना देण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे पत्र?

आमचा साहित्य संमेलनास विरोध असून त्याठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतःचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना शासनाने अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून म्हणले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, याचा गैरसमज आम्ही #@$ डू नाही - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT