Manoj Jarange Patil Rally Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये उद्या जरांगे पाटील यांची शांतता रॅली, पोलिस भरती पुढे ढकलली; शाळा- कॉलेजला सुट्टी

Mahashantata Rally At Sambhajinagar: मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे उद्या संभाजीनगरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. तसंच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Priya More

रामू ढाकणे, संभाजीनगर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची १३ जुलै रोजी म्हणजे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशांतता रॅली निघणार आहे. जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या निमित्ताने प्रशासन देखील कामाला लागले आहे. जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे उद्या संभाजीनगरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची शांतता रॅली उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार आहे. या रॅलीला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शहराची लाईफ लाईन असलेला जालना रोड सकाळी ९ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. जालना रोड ८ ते ९ तास बंद राहणार आहे. तर शहरातील ५०० शाळा आणि ५० पेक्षा अधिक महाविद्यालय यासह जालना रोडवरील खासगी दुकाने आणि हॉटेल यावर याचा परिणाम होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे संभाजीनगर शहरातील प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शाळांना शिक्षण विभागाने एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान जालना रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय सध्या सुरू असलेली कारागृह पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली १३ जुलैला छत्रपती संभाजीनगरात येणार आहे. या रॅलीसाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सकाळी ११ वाजता संभाजीनगरच्या सिडको येथील वसंतराव नाईक चौकातून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. तर क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणोर आहे. जरांगे पाटील यांच्या या महाशांतता रॅलीमध्ये मोठ्यासंख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

SCROLL FOR NEXT