Chhatrapati Sambhajinagar: Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Accident: परीक्षेला जाताना डंपरने चिरडलं, तिघे बहिण- भाऊ जागीच ठार; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Chhatrapati Sambhajinagar Accident: छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर आज सकाळी (८, फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ८ फेब्रुवारी २०२४

Chhatrapati Sambhajinagar Accident:

छत्रपती संभाजीनगरमधून एका मोठ्या अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघा भाऊ- बहिणींचा जागीच मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर आज सकाळी (८, फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले. या दुर्घटनेत परीक्षेला जाणाऱ्या तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. या भयंकर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातातील मृत भाऊ- बहिण हे परभणी (Parabhani) जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Kothare: महेश कोठारे म्हणाले मी मोदी भक्त; संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले - 'तात्या विंचू रात्री येऊन...'

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT