CM Eknath Shinde Chhatrapati Sambhajinagar News saam tv
महाराष्ट्र

CM Shinde On Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी एकोपा कायम राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Eknath Shinde News :छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Chandrakant Jagtap

>> सुरज सावंत | माधव सावरगावे | संजय डाफ

CM Eknath Shinde Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा झाला. यानंतर किरडपुरा परिसरात हिंसाचार घडला. परंतु आता छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी स्थानिक पोलिसांशी बोललो आहे, आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. आज रामनवमी आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की सर्वांनी शांतते सण साजरे करावे. आजपर्यंत जसे सर्व सण एकोप्याने साजरे करत आलो, तसेच आपण सर्व सण साजरे करावेत असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

सर्वांनी शांतता राखावी - उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोक प्रक्षोभक वक्तव्ये करून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कुणी असे चुकीचे वक्तव्ये करत असतील तर त्यांनी ते करू नये. सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

सर्वांनी एकत्र येऊन शहर शांत ठेवण्याची वेळ - खा. जलील

छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले एवढे वर्ष आपण सर्व सण-उत्सव एकत्रपणे साजरे करत होते. पण अशी काय परिस्थिती निर्माण झाली की अशी घटना घडली. जे काही आरोप करण्यात येत आहे, त्यासाठी आपण वेगळा दिवस ठरूव. सध्या हे शहर कसे शांत ठेवता येईल यावर लक्ष देण्याची वेळ आहे, असे खासदार जलील म्हणाले. (Latets Marthi News)

चंद्रकांत खैरे यांचा एमआयएम-भाजपवर आरोप

महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सभेत विघ्न घालण्यासाठी भाजप आणि एमआयएम जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पोलिसांनी इम्तियाज जलील याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी. या सर्व षडयंत्र मागे कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT