Sambhajinagar MNS District Collector Statement Saam Tv News
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : राज ठाकरे कडाडले, संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते कामाला लागले; औरंगजेबाच्या कबरीवरुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Chhatrapati Sambhajinagar MNS Worker : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून निवेदन दिलं आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन अक्षरश: रान पेटलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधातील पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. यातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर संभाजीनगरमध्ये मनसे कार्यकर्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून निवेदन दिलं आहे. औरंगजेबच्या कबरीजवळ जर सजावट असेल तरी ती त्वरीत काढली जावी, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख त्या निवेदनात आहे.

मनसेनं निवेदनात काय म्हटलेलं आहे?

1) औरंगजेबच्या कवरीजवळ जर सजावट असेल तरी ती त्वरीत काढली जावी.

2) ह्यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही.

3) सर्व शाळातील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथ काढण्याचा आदेश काढण्यात यावा.

4) इथे एक बोर्ड लावन्यात यावा 'आम्हा मारण्यांराना संपावयाला आलेला औरंगजेब इथे गाहला गेला"

5) या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.

दि. ३० मार्च रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला ह्या वेळी दिलेल्या भाषणात मा. राजसाहेबांनी सध्याच्या असलेल्या परिस्थितीवर, इतिहासावर आणि गलिच्छ जातीय राजकारणावर प्रकाश टाकला, चुकीच्या गोष्टीवर सडेतोडपणे टिका केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आमच्या संभाजी महाराजांना अमानुषपणे, कुरपणे मारणाऱ्या औरंगजेबची कबर आहे, छत्रपती शिवाजी महारांजानी दिलेला विचार औरंगजेब नष्ट तर करू शकलाच नाही पंरतू तो स्वताः इथे पवित्र भुमीत गाडला गेला, जो आमच्या धर्मावर उलटला होता, आमची मंदिरे पाहत होता, आमच्या आया-बहिणीची आनु लुटत होता तो इथेच संपला हा इतिहास आहे.

अश्या परिस्थतीत त्याच्या कबरी जवळ जर सजावट असेल तर ती सजावट त्वरीत काढूण टाकण्यात यावी. ती नुसती कबर दिसली पाहिजे तिथे यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे होता कामा नये. जसे की, रंगरंगोटी, दुरुस्ती, बांधकाम काहीच नको.

इथे एक बोर्ड लावन्यात यावा "आम्हा मारण्यारांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला" त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सहली तेथे आयोजीत करण्यात याव्यात जेणे करून आमच्या पुढील पिढीला आणि जगाला हे कळले पाहिजे की आम्ही कुणाला गाडलं आहे, त्याच प्रमाणे येथे सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फुल चादर चढवण्यास येईल त्यांच्यावर देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असं या निवेदनात म्हणण्यात आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC पक्ष कार्यालयात नेलं अन् विवस्त्र करून व्हिडिओ..भाजप महिला नेत्याचा गंभीर आरोप; परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

अबब! एक वर्षाच्या चिमुकल्याच्या चाव्यानं कोब्रा ठार; VIDEO

Thane News: ठाण्यातील कोपरी पूल ८ दिवस वाहतुकीसाठी बंद; सॅटिस प्रकल्पाच्या गर्डर बसविण्याचे काम सुरू|VIDEO

Shivani Rangole: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधल्या मास्तरीणबाईचं सौंदर्य पाहून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT