Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : धावत्या दुचाकीवरून तरुणाला खाली ओढलं, कारमध्ये टाकून पसार झाले; संभाजीनगरमध्ये अपहरणाचा थरार!

Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स बाइकच्या व्यवहारावरून मित्रांमध्ये वाद झाला. या वादानंतर तरुणांनी एका तरुणाचं अपहरण केलं. पोलिसांनी ७ तासांत तरुणाची सुटका केली आणि ३ आरोपींना अटक केली.

Alisha Khedekar

  • स्पोर्ट्स बाइक वादातून १७ वर्षीय रोहनचे अपहरण

  • बजरंग चौक ते वाळूजदरम्यान मध्यरात्री घटना

  • सिडको पोलिसांनी ७ तासांत सुटका केली

  • CCTV व तांत्रिक तपासामुळे ३ आरोपी अटकेत

  • इतर आरोपी फरार, शोध व पुढील तपास सुरू

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मित्रांमध्ये स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी विक्रीवरून शुल्लक वाद झाला. या वादानंतर तिघांनी एका मुलाचे अपहरण केले. चालत्या दुचाकीवरून ओढून खाली पाडत कारमध्ये टाकून पसार झाले. भररस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर सिडको पोलिसांनी सात तासांत तरुणाची सुटका केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बजरंग चौक ते वाळूज रांजणगावदरम्यान हा थरार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय रोहन (नाव बदलले) शुक्रवारी रात्री ११ वाजता मित्र आर्यनसोबत बाहेर गेला होता. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते दुचाकीने मेडिकव्हर रुग्णालयाकडून बजरंग चौकाच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान कारमधून दोघांनी उतरून त्यांना अडवून रोहनला खाली ओढले.

रोहनला ६ जणांनी कारमध्ये डांबले आणि कार मधून चौघे तर दोघे दुचाकीवरून पसार झाले. घडलेला सगळं प्रकार तातडीने आर्यनने रोहनच्या आईला कळवला. रोहनच्या आईने तत्काळ सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. रोहनच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा माग काढला. वाळूज शिवारात कारचा वेग कमी होताच पथकाने कार अडवली. त्यात विवेक गणेश सोनवणे (वर्षे १९), पांडुरंग माधव सोनवणे (वर्षे २१), रोहन सुनील डव्हळे (वर्षे १९) यांच्या मुसक्या आवळल्या. तर त्यांचे आणखी साथीदार पसार झाले आहेत. दरम्यान अन्य अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: सरकार देणार 1 तोळा सोनं? मोफत सोनं देण्याची सरकारची योजना? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mahayuti Clash:अजितदादा सावरकरवादी होणार? विचारसरणीवरून महायुतीत वादावादी?

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचा डाव, VIDEO

पुणे आणि पिंपरीचा 'दादा' कोण? महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी, VIDEO

BMC Election: बंडखोरांमुळे वरळी आदित्य ठाकरेंकडून जाणार? बालेकिल्ल्यात ठाकरेंची डोकेदुखी वाढली

SCROLL FOR NEXT