Chhatrapati Sambhajinagar BJP And Shivsena Clash News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar BJP And Shivsena Clash News : संभाजीनगरमध्ये बकऱ्यांच्या व्यवहारातून दोन गटांमध्ये मध्यरात्री राडा झाला. यादरम्यान दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली असून ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेत गावात बंदोबस्त वाढवला आहे.

Alisha Khedekar

  • अंभई गावात बकऱ्यांच्या व्यवहारातून दोन गटांमध्ये राडा

  • दगडफेक व वाहनांची तोडफोड, ५ ते ६ जण जखमी

  • पोलिसांची तातडीची कारवाई, १५ जण ताब्यात

  • गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar BJP And Shivsena Midnight Clash Video छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका अंतर्गत अंभई गावात काल मध्यरात्री दोन गट आमनेसामने येत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बकऱ्यांच्या व्यवहारातून वाद उफाळल्याने दोन गटात मारामारी झाली असून या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करून १५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बकऱ्यांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद हळूहळू चिघळला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी व दगडफेक झाली. या वादाला पुढे राजकीय स्वरूपही प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते असे दोन गट समोरासमोर आल्याची माहिती मिळत आहे.

या राड्यात जमावाने तब्बल १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवेळी सुमारे ५०० ते ६०० लोकांचा जमाव गावात जमला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गावात तळ ठोकला. या घटनेत ५ ते ६ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या मारहाणी प्रकरणानंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

गॅसमुळे कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; काम बंद आणि खाण्याचेही वांदे, VIDEO

कॅप्टन खरात महिलांचं शोषण करणारा भोंदूबाबा; महिला अत्याचाराचे 58 व्हिडीओ समोर?

Guardian Minister: नंदुरबार जिल्ह्याला मिळाला नवा पालकमंत्री,कोणत्या पक्षाच्या नेत्याची लागली वर्णी?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; क्लास वन अधिकारी ठाकरेंना ५० हजारांची लाच घेताना पकडलं

SCROLL FOR NEXT