Crime  Saam tv
महाराष्ट्र

महिलेने महिलेचा केला निर्घृण खून, मेल्यानंतरही चाकूने वार; अत्यंत भयानक व्हिडिओ समोर

Maharashtra crime news today : छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर खून प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आरोपी महिलेने दुसऱ्या महिलेवर निर्घृण हल्ला करून हत्या केली.

Namdeo Kumbhar

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर , साम टीव्ही प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar Bajajnagar murder viral video details : छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, आता या प्रकरणातील एक अत्यंत भयानक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका महिलेने दुसऱ्या महिलेचा निर्घृण खून केला. आरोपी महिला इतक्यावरच थांबली नाही मृतदेहावर चाकूने सपासप वार केले. हा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील बजाजनगर येथे २२ एप्रिल रोजी घडलेल्या या थरारक घटनेत, आरोपी शैला सोनार हिने साधना सोनपेठकर यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. तिच्याकडे चाकू, पिस्तूल, स्प्रे आणि कुलूप यांसारखे साहित्य असल्याचे तपासात समोर आले आहे. घरात घुसल्यानंतर दोघींमध्ये वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने पिस्तूल रोखून साधना सोनपेठकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी महिला अत्यंत निर्दयीपणे पोट, छाती आणि गळ्यावर वार करताना दिसत आहे. या घटनेची भीषणता पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दरवाजा तोडून आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी शैला सोनार हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Water Benefits: सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच किती ग्लास पाणी प्यावं आणि का? शरीरात होतील हे ३ जादुई बदल

Abhijeet Dipke: चहा प्यायला चला म्हणत थेट पोलिस ठाण्यात नेलं, अभिजीत दीपकेंना अटकेचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: शरद पवार आज दुष्काळी तालुक्याचा दौरा करणार, पुरंदरमधील शेतकऱ्यांना भेटणार

Rose Water Bath Benefits: गुलाबपाण्याने आंघोळ केल्याने शरीराला होतात 5 आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल आतून स्वच्छ

Today Horoscope : टेन्शन नॉट! अचानक होईल धनलाभ, 'या' ५ राशींचे नशीब उजळणार; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT