Devotee hangs himself after posting darshan video Saam tv news
महाराष्ट्र

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Chhatrapati Sambhajinagar Crime News: पंढरपूरहून विठ्ठल-रुखमाईचं दर्शन घेऊन परतल्यानंतर ३४ वर्षीय धनंजय पडघम याने छत्रपती संभाजीनगर येथे आत्महत्या केली. पोलीस कारणांचा शोध घेत आहेत. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज रांजणगाव येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेऊन आल्यानंतर एका तरूणाने आत्महत्या केलीय. तरूण आधी आषाढी एकादशीनिमित्त वारीला जाऊन आला. नंतर घरात येऊन त्यानं स्वत:ला संपवलं. पोलिसांनी या घटनेची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तरूणाने आत्महत्या का केली? याचा शोध घेत आहेत.

धनंजय आत्माराम पडघम (वय वर्ष ३४) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी तो गेला होता. वारी दरम्यान, त्यानं व्हिडिओ शूट करून शेअर केला. या व्हिडिओमध्ये पंढरपूर आणि वारीचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत.

दर्शन घेतल्यानंतर धनंजय पुन्हा छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज रांजणगावात परतला. त्याने रात्री घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तपासणी केली असता पोलिसांना धनंजयच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडले.

धनंजय छत्रपती संभाजीनगरमधील घरात एकटाच राहत होता. पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे. धनंजयने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? पंढरपुरात जाण्यापूर्वी त्याचं कुणासोबत भांडण झालं होतं का? त्याला कोणत्या गोष्टीचा मानसिक त्रास होता का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT