Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: इंस्टाग्रामवर मैत्री, फिरायला गेल्यावर काढले अश्लिल फोटो अन्.. अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर

Crime New Update: या प्रकरणात तिघांविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

नवनित तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात घडला आहे. या प्रकरणात तिघांविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी ही छत्रपती संभाजीगनरमधील (Chhatrapati Sambhajinagar) एका नामांकित कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकत होती. या मुलीची अनिकेत राठोड, कुणाल बावत आणि उमेद पाशा या तिघांशी इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवरुन ओळख झाली होती. त्यांच्यात ऑनलाइन चॅटिंग होत असे.

याच मैत्रीचा फायदा घेत आरोपींनी मुलीला उस्मानपुरा भागातील एका हॉटेलच्या गार्डनमध्ये नेत नकळत तिचे फोटो काढले. यानंतर त्या मुलीने तिघांसोबत बोलणे बंद केले. आधी तिघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने प्रतिसाद दिला नाही. यानंतर अरोपींनी तिचे फोटो व्हायरल केले.

या घटेनंतर पिडीत मुलीने पोलिसांत धाव घेत तिनही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पिडितेच्या तक्रारीनुसार तिघांविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

SCROLL FOR NEXT