महाराष्ट्र

Sambhajinagar Accident: भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; बापासह ६ वर्षीय पोरीचा गेला जीव

Speeding Car Hit Bike: छत्रपती संभाजीनगरमधील जरंडी रस्त्यावर एका भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिलीय. यात बापलेकीचा जागीच मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या जरंडी रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झालाय. अजय रघुनाथ राठोड आणि वैशाली अजय राठोड असं मृतांची नावे आहेत. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेत अजय राठोड आणि त्याच्या एका सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

अजय रघुनाथ राठोड आणि वैशाली अजय राठोड निंबायती नाव्ही तांडा येथील रहिवाशी होते. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झालाय. मृत व्यक्तींना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सोयगाव पोलीस करत आहेत.

डोक्यावरती 70 हजाराचं हेल्मेट तरीही...; प्रसिद्ध उद्योजकाच्या पोरानं अपघातात जीव गमावला

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान बाईकचा अपघात झाला. यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा मृत्यू झालाय. सिद्धार्थ विलास रेडेकर, असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धेश बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा मुलगा होता. सिद्धार्थकडे १२ लाख रुपयांची बाईक होती, तसेच ७० हजार रुपयांचं हेल्मेट होते. कोल्हापूरच्या दिशेने येत असताना एका धोकादायक वळणावर तवेरा कार आणि सिद्धेशच्या बाईकची समोरासमोर धडक झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT