Sambhajinagar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Sambhajinagar Accident: संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागले. गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

  • गणपती आगमन मिरवणुकीत कंटेनर घुसला

  • अपघातामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

  • पिंप्रीराजा गावाजवळ घडली घटना

  • अपघातामध्ये १२ जण जखमी

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली. या ठिकाणी गणेशोत्सवाला गालबोट लागलं. गणरायाच्या आगमन मिरवणुकीमध्ये भरधाव कंटेनर घुसला. या अपघातामध्ये कंटेनरने १४ जणांना धडक दिली. यामधील २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये १२ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट लागले. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावच्या वळणावर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत कंटेनर घुसला. मिरवणुकीत घुसलेल्या या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.

विठ्ठल राममाळ जाधव आणि रमेश लहूजी बनसोडे अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गणपती आगमन मिरवणुकीसाठी गावात तयारी सुरू असताना हा अपघात झाला. मिरवणुकीसाठी रस्त्यावर गर्दी जमलेली असतानाच भरधाव कंटेनर मिरवणुकीत घुसला आणि दुचाकीस्वारांना चिरडत पुढे गेला. अपघातानंतर जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोन्ही मृतांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT