Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : रणरागिनीने धडा शिकवला! भरचौकात छेड काढणाऱ्याचा गाल केला लाल, संभाजीनगरातील व्हिडिओ व्हायरल

Sambhajinagar Girl Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक चालकाने एकट्या मुलीशी अश्लील वर्तन केल्यानंतर तरुणीने धाडसाने प्रत्युत्तर देत त्याला कानाखाली दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी चालकावर कारवाई केली आहे.

Alisha Khedekar

छत्रपती संभाजीनगरात ट्रक चालकाने मुलीशी केले अश्लील वर्तन

संतापलेल्या तरुणीने चालकाला कानाखाली दिली चपराक

पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून कारवाई केली

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकट्या मुलीला पाहून एका ट्रक चालकाने अश्लील वर्तन केले. मात्र या मुलीने दुर्गेचं रूप घेऊन आपल्या हाताना शस्त्र बनवतं या ट्रक चालकाशी दोन हात केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या रणरागिणीने दाखवलेल्या धैर्याचं कौतुक नेटकरी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तरुणी रस्त्यावर मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. रस्त्यावरून गाड्यांची ये जा सुरु होती. मात्र रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकच्या चालकाने तरुणीकडे बघून काही इशारे केले. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केले. हे पाहून तरुणी संतापली. कशाचीही परवा न करता मन एकवटून तिने ट्रकचालकाच्या कानाखाली मारली.

एवढं होऊनही हा नालायक ट्रक चालक थांबला नाही. त्याने तरुणीला अजून त्रास दिला. मात्र जवळच्या चौकात ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी हा सर्व प्रकार बघताच क्षणी धावत तरुणीजवळ गेले. आणि नराधम ट्रक चालकाला तरुणीची पायधरुन माफी मागायला लावली. मात्र तरुणीने बाजूला सरकत त्याची माफीही स्वीकारली नाही.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीचे नाव शिवराम तानाराम देवासी असे आहे. तो कर्नाटकातला असून ट्रक चालक आहे. तो कर्नाटकातून माल घेऊन मोंढा नाका भागात आला होता. तेथे माल उतरवल्यावर त्याने मद्यप्राशन केले. तेथून क्रांती चौकात जाऊन या तरुणीची छेड काढली. मुलीसोबत गैरवर्तन करताना शिवराम हा नशेत होता. दामिनी पथकाच्या निर्मला अंभोरे यांच्या हस्तक्षेपानंतर क्रांती चौक पोलिसांनी शिवरामवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Doctor Case: सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, PSI गोपाल बदने पोलिस खात्यातून बडतर्फ

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक

SCROLL FOR NEXT