BJP Faces Setback in Gangapur Saam
महाराष्ट्र

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

BJP Faces Setback in Gangapur: छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर. भाजप पक्षात प्रवेश करणारे अविनाश पाटील यांनी १५ दिवसांत पक्षाची साथ सोडली. तसेच पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली.

Bhagyashree Kamble

  • छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण फिरलं.

  • १५ दिवसांत भाजप पक्ष सोडला.

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात घरवापसी.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलथापालथीचा खेळ पाहायला मिळत आहे. नुकतेच भाजप पक्षात प्रवेश केलेले अविनाश पाटील यांनी केवळ १५ दिवसांतच भाजपला रामराम ठोकला. तसेच पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत घरवापसी केली. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायीताच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरच पार पडतील. या निवडणुकांकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.

नुकतेच भाजप पक्षात प्रवेश केले अविनाश पाटील यांनी १५ दिवसांतच पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे. अविनाश पाटील यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. घरवापसी केल्यानंतर अविनाश पाटील यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केलीये.

शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे पाटील हे अत्यंत विश्वासू आहेत. अविनाश पाटील यांनी २८ ऑक्टोबर रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून त्यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शब्द दिल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याचे समजताच, अविनाश पाटील यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्धवसेनेत प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तानाजी सावंत यांच्या भावाचा भाजप प्रवेश रखडला; कौटुंबिक की राजकीय मतभेद? नेमकं कारण काय?

Ajit Pawar : अजित पवार फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार होते, दिग्गज नेत्याचा खळबळ उडवणारा दावा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Rashmika-Vijay: 'प्रत्येकाच्या आयुष्यात विजय असावा...'; लग्नाच्या चर्चांमध्ये विजयने केलं रश्मिकाला किस, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT