महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : गरोदर मातेसह नवजात बालकाचा रस्त्यातच मृत्यू ; मन सुन्न करणारी घटना

Chhatrapati Sambhaji Nagar News : 27 वर्षीय गरोदर मातेसह नवजात बालकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात रविवारी पहाटे घडली.

माधव सावरगावे, औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी रुग्णालयांनी उपचार न करताच दुसरीकडे रेफर केल्याने 27 वर्षीय गरोदर मातेसह नवजात बालकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात रविवारी पहाटे घडली. मदिनाबी जमील शाह (रा. आमठाणा) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आमठाणा येथील मदिनाबी गरोदर होती. प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिच्या पतीसह एका नातेवाईक महिलेने तिला आमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी सायंकाळी ७ वाजता दाखल केले.

तेथे तिच्यावर प्रसूतीसाठी प्रयत्न करताच तेथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रात्री ९ वाजता सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. तेथेही डॉक्टरांनी प्रसुतीसाठी प्रयत्न न करता तिला रात्री १२ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर केले. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

मदिनाबीची दोन बाळे यापूर्वी प्रसूतीदरम्यान मरण पावली होती. सध्या तिला दोन मुली आहेत. मदिनाबीचे हे पाचवे बाळंतपण होते. तिच्या जाण्याने दोन लहान मुलींचे मातृछत्र हरपले आहे.

तर गरोदर महिलेला ज्यावेळी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिचे हिमोग्लोबिन केवळ 3 पॉइंट होते. तर बीपी 180 झाला होता. बाळ गर्भातच मरण पावले होते. तिची प्रकृती गंभीर होती म्हणून तिला आम्ही रात्री रेफर केले,असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT