सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळावी यासाठी आजच्या तरुण पिढीला रील्सचे वेड लागले आहे. रील तयार करण्यासाठी अनेकदा स्टंटबाजी केली जाते, तर बऱ्याचदा हे रील तयार करणे अनेकांच्या जीवावर बेतते. अशाच पद्धतीने रील तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणीने आपला जीव गामावल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. कारमध्ये बसून रिल्स (Reels) बनवत असताना तरूणी कारसोबत दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली आहे. कारमध्ये बसून रिल्स बनवणे एका तरुणीला चांगलंच महागात पडलं. नुकताच कार चालवायला शिकलेली तरुणी दत्त मंदिराजवळ कार चालवत रील बनवत होती. त्यावेळी या तरुणीने कार पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि मोठा अनर्थ घडला. कारसोबत ही तरुणी दरीत कोसळली.
या घटनेमध्ये २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचे नाव आहे. श्वेता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहत होती. ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून एका कारणे दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी तरुणी आपल्या मोबाईलमध्ये रिल् तयार करत होती. अशामध्ये तिने आपल्या मित्राला मी पण कार चालून बघते तू रील बनव असे सांगितले. मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने कार पुढे नेण्याऐवजी कारचा रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली.
या अपघातामध्ये श्वेता सुरवसेचा मृत्यू झाला असून तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यामुळे निसर्गरम्य असतो. त्यामुळे अनेक पर्यटक तिथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवत असतात. मात्र आज याठिकाणी कार चालवत रिल्स बनवणे श्वेता सुरवसेच्या जीवावर बेतले. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. तर श्वेताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.