Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: शेअर मार्केटमध्ये ३० लाख रुपये गमावले, कर्जबाजारी मुलाने वडिलांना संपवलं; संभाजीनगरमधील घटना

Satish Daud-Patil

रामू ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News

शेअर मार्केटमध्ये ३० लाख रुपये हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने वडिलांची हत्या केली. इतकंच नाही तर, त्याने जन्मदात्या आईचा देखील गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Breaking Marathi News)

या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण पाटील (वय ६२ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील (Chhatrapati Sambhajinagar) डीलक्स पार्क येथे श्रीकृष्ण पाटील आपल्या कुटुंबासहित राहतात.

सोमवारी रात्री पाटील कुटुंबातील सर्वजण जेवण करुन झोपले होते. मंगळवारी पहाटे घरात आवाज झाल्याने त्यांची मुलगी अचानक झाली झाली. त्यावेळी आरोपी रोहित हा आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता. मुलीने आरडाओरड केली असता, आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. (Latest Marathi News)

दरम्यान, मुलीने वडिलांकडे धाव घेतली असता, तिला समोरील हॉलमध्ये वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आरडाओरड झाल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. तेव्हा आरोपीने उडवा उडवीची उत्तरे देऊन आपल्या घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला.

मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. कर्जबाजारीला कंटाळून आपनच वडिलांची हत्या केल्याची कबूली आरोपी रोहित याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपीविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौंदर्याची क्वीन Sanya Malhotra

Kolhapur News : जत्रेसाठी आलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू

Kolhapur News Today: 4 जणांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू! कोल्हापुरातील आणुर गावातील दुर्दैवी घटना

Today's Marathi News Live : ५० लाखांची रोकड दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT