Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतातून घरी येताच शेतकऱ्याने सोडले प्राण

Farmer Death Due To Heatstroke: शेतातून दुपारी घरी आल्यानंतर शेतकऱ्याला चक्कर आल्यासारखे आणि घाम फुटल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना रस्त्यात शेतकऱ्याने प्राण सोडले. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कवली गावामध्ये ही घटना घडली आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) उष्माघाताचा (Heatstroke) पहिला बळी गेल्याची घटना समोर आली आहे. शेतातून घरी येताच शेतकऱ्याने प्राण सोडले. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कवली गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील तापमान प्रचंड वाढले आहे. याचा नागरिकांना त्रास होताना दिसत आहे.

कवली गावामध्ये राहणारे प्रकाश भागवत तराल (६२ वर्षे) असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कवली शिवारातील आपल्या शेतामध्ये ते गुरुवारी गेले होते. शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामे आटोपून ते दुपारी घरी आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले. घाम फुटून त्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्यांना तात्काळ पिंपळगाव (हरे) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पाचोरा येथे हलविताना त्यांचा रस्स्त्यातच मृत्यू झाला.

याप्रकरणी तालुका आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे. तर महसूल विभागाने याची नोंद केली आहे. सोयगाव तालुक्यात आठवड्याभरापासून विक्रमी तापमानाची नोंद होत असताना सलग तीन दिवस ४३ अंशावर असलेल्या तापमानाने गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस ४४ अंशावर तापमानाची विक्रमी नोंद सोयगाव तालुक्यात झाली आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT