Chhatrapati Sambhaji Nagar Paithan Accident News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News : भाजप नेत्याच्या सुसाट कारने पिता-पुत्राला उडवलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhaji Nagar Paithan Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण अपघात झाला. भाजप नेत्याच्या कारने पिता-पुत्रांना जोरदार धडक दिली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली. एका भाजप नेत्याच्या कारने दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इसाक शेख आणि अन्वर शेख, अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी पिता-पुत्र पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी गावातील रहिवासी असून ते सोमवारी लग्नासाठी बाहेरगावी निघाले होते.

ढाकेफळ रस्त्यावरील वडगाव शिवारात त्यांची दुचाकी आली असता, भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की पिता-पुत्र रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळले. अपघातानंतर कारची समोरील दोन्ही टायर फुटली. घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, स्थानिकांनी त्याला गाठून चांगलाच चोप दिला. यानंतर ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिला. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत असलेल्या पिता-पुत्रांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, अपघातग्रस्त कार ही भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांची असल्याची माहिती आहे. मात्र अपघात झाला, त्यावेळी ही कार नेमकं कोण चालवत होतं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

SCROLL FOR NEXT