Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या ६ वर्षांच्या मुलाला मारहाण करीत चटके दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. वाळूज भागातील घाणेगाव येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पीडित मुलासह त्याच्या दोन भावांची घरातून सुटका केली आहे.
या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून जन्मदात्या आईनेच मुलांचा छळ केल्याचं समोर येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तीन लहान भावांची भावांची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालसुधारगृहात पाठविले आहे. मुलांच्या आईवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आईने मुलाला मारहाण करत चटके दिल्याचा व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने चाइल्ड हेल्पलाइनला पाठविला होता. यावरून चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या व्हिडीओचा शोध घेतला. दरम्यान, हा व्हिडीओ वाळूज (Chhatrapati Sambhajinagar) परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा असल्याचं समजलं.
पोलिसांनी तातडीने महिलेच्या घरी धाव घेत पीडित मुलासह त्याच्या दोन भावंडाची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलीस (Police) या महिलेच्या घरी धडकले, तेव्हा तिन्ही मुलांना आईने घरातच कोंडून ठेवून आई-वडील बाहेरगावी निघून गेले होते.
घरात ठेवलेल्या मुलांचे वय मोठा मुलगा ११ वर्षांचा, मधला ८ वर्षांचा मुलगा आणि लहान मुलगा ६ वर्षाचा आहे. पोलिसांनी तातडीने या मुलांची सुटका केली. पोलिस ठाण्यात आणलेली तिन्ही मुले भुकेली असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना त्यांना जेवण दिले.
पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता, मुलांनी आमचे पप्पा दुसरेच असून, आई नेहमी लहान भावास उपाशी ठेवून मारहाण (Crime News) करते, पायाला चटके देते. त्याला आईने गरम तव्यावरही बसविले होते असे सांगितले. या प्रकरणात आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत , तिघा भावांची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालसुधारगृहात पाठविले आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.