Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : क्रूरतेचा कळस! किरकोळ वाद जिवावर बेतला; तरुणाची दगडाने ठेचून हत्या

किरकोळ वादातून तरुणाची हत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

Ruchika Jadhav

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून तरुणाची हत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. (Crime News)

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घूनपणे हत्या करण्यात आली. वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासुरगाव येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून त्या संशयिताने भावाच्या मदतीने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कृष्णा पोपट हरिश्चंद्रे असे हत्या झालेल्या 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडिलांचं मुलिसोबत क्रूर कृत्य

उत्तर प्रदेश येथून मोठी बातमी समोर आली आहे. लग्नानंतर मुलीला घारी आणताना वाटेतच तिच्या वडिलांनी तिच्या तोंडात कापडाचा एक बोळा कोंबला. त्यानंतर त्यांनी तिच्या तोंडात आणि अंगावर केमिकल ओतलं. तसेच तिला भरपूर मारहाण केली तिचा गळा देखील आवळला आणि रस्त्त्याच्या कडेला तिला फेकून दिले.पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. त्यानंतर या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

दोन दिवसांआधीच या तरुणीचे लग्न झाले. तिच्या आई बाबांच्या पसंतीच्या मुलाबरोबर तिचं लग्न (Wedding) झालं होतं. मात्र तरुणीचे दुसऱ्या एकावर प्रेम होते. तिला त्या मुलाबरोबर राहायचे होते. मात्र घरच्यांचा तिच्या प्रेमाला विरोध होता. मुलीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून तिच्या वडिलांनी तिला अशी अमानुष वागणूक दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT