Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला व्हिडिओ

girlfriend boyfriend affair : पीडितेने या बाबत माहिती मिळताच कुटुंबीयांसह एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Wedding : छत्रपती संभाजीनगर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचे ज्या मुलाशी लग्न ठरले होते त्यालाच तीचा अश्लिल व्हिडीओ पाठवण्यात आला आहे. तरुणीच्या आधीच्या प्रियकराने हे किळसवाणं कृत्य केलं आहे. या खळबळजनक घटनेमुळे पीडित तरुणी पुरती भयभीत झाली आहे. तसेच आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Chhatrapati Sambhaji Nagar )

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वर्षभरापासून प्रेमात असलेली तरुणी दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार असल्याचे कळताच त्या तरुणाने तिच्यासोबत एकांतात मोबाइलवर बनवलेला व्हिडिओ आणि काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केले. एवढेच नव्हे तर तरुणीच्या आत्याच्या मुलाला फोन करुन त्याने शिवीगाळ देखील केली. हा सर्व प्रकार 1 ते 24 मार्चदरम्यान घडला.

पीडितेने या बाबत माहिती मिळताच कुटुंबीयांसह एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. अरबाज खान असे आरोपीचे नाव आहे.

तरुणीच्या घरी लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची लगबग सुरू असतानाच तिच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्यांचा एक भूतकाळ असतो. मात्र तो भूतकाळ अशा पद्धतीने संकट होऊन उभा राहील याची तरुणीला काहीच कल्पना नव्हाती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...

Jolly LLB 3: कोर्टात दोन जॉली देणार कॉमेडीचा ट्रिपल डोस; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी येणार आमने-सामने

Solapur Rain : दक्षिण सोलापुरात पावसाचा हाहाकार; अनेक गावांना फटका, शेतात पाणीच पाणी

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!

SCROLL FOR NEXT